जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल

By admin | Published: June 13, 2016 05:46 AM2016-06-13T05:46:28+5:302016-06-13T05:46:28+5:30

आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अ‍ॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला

Dear Buddha in the JEE Advanced | जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल

जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल

Next


नवी दिल्ली / मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अ‍ॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला. यात जयपूरचा अमन बंसल याने देशातून तर, मुंबईच्या प्रिय शहा याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबईचा चिन्मय आवळे याने अनुसूचित जाती वर्गात देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.
जीईई या स्पर्धा परीक्षेतील निकालाच्या आधारावरच आयआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. या परीक्षेत यमुनानगरचा भावेश धिंग्रा हा देशात दुसरा तर जयपूरचाच कुणाल गोयल हा तिसऱ्या स्थानी राहिला. मुलींमधून कोटाची रिचा सिंग अव्वल आली आहे.
गत २२ मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेला १ लाख ५५ हजार ९४८ विद्यार्थी बसले होते. त्यातील केवळ ३६ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
३७२ गुणांची जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा दोन विभागांत घेण्यात येते. मुंबईच्या प्रिय शहाने २८५
गुण मिळवत देशाच्या यादीत
सोळावा क्रमांक पटकावला आहे.
तर राज्यात मुलींमध्ये पहिली
आलेली डिंपल कोचर देशात २९५व्या क्रमांकावर आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
>घरचे पाठिशी
पालकांच्या पाठिंब्यामुळे चांगले गुण मिळविणे शक्य झाले. बहीण, आई पाठिशी उभ्या राहिल्या. मुंबईत कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरींग करणार. - प्रिय शहा, मुंबई
>पुढचे शिक्षण मुंबईतूनच
गेल्या दीड वर्षांपासून अभ्यास करत होतो. आजीचे मोठे पाठबळ मिळाले. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरींग करायचे आहे. आयआयटी मुंबईतूनच पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
- चिन्मय आवळे, नवी मुंबई

Web Title: Dear Buddha in the JEE Advanced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.