मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील 11 मजुरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 08:08 PM2017-05-11T20:08:36+5:302017-05-11T20:11:00+5:30
मध्यप्रदेशमध्ये काम करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी आहेत.
ऑनलाइन लोकमत
जबलपूर, दि. 11 - मध्यप्रदेशमध्ये काम करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी आहेत. सर्व जखमींवर जबलपूरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीतील 11 जणांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अन्य चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तेंदुपत्ता तोडण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या विविध ठिकाणातून जबलपूर येथे गेलेल्या मजुरांच्या वाहनाला गुरुवारी (दि.११) पहाटे २ वाजता घडली. ही घटना मध्यप्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील जमुनिया येथील पुलावर घडली.
तेंदुपत्ता कंत्राटदाराने मजुरांना जंगलात नेण्यासाठी वनविभागाचे वाहन नेले होते. वाहन चालक मद्य प्राशन करुन होता. जमुनिया येथील पुलावर उतार भाग असल्याने वाहन चालकाने डिझेल वाचविण्याच्या नादात वाहनाला बंद केले. यामुळे स्टेअरिंग लॉक झाले. परिणामी पूलावरुन पीकअप वाहन 25 फुट खोल असलेल्या नाल्यात कोसळले.