संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'बाजीराव'चा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:47 PM2019-05-03T16:47:54+5:302019-05-03T16:48:54+5:30
पांढऱ्या वाघाचे नाव बाजीराव असे ठेवण्यात आले होते. त्याचा जन्म 2001 मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या वाघांच्या जोडीपासून झाला होता.
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पांढऱ्या वाघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वाघाचा वयोमानामुळे मृत्यू झाला आहे.
पांढऱ्या वाघाचे नाव बाजीराव असे ठेवण्यात आले होते. त्याचा जन्म 2001 मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या वाघांच्या जोडीपासून झाला होता. बाजीरावचा मृत्यू 3 मे रोजी झाल्याचे उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संधीवात आणि स्नायुदुखीमुळे तो गेल्या 4 वर्षांपासून त्रस्त होता. गेल्या 10 दिवसांपासून त्याला चालताही येत नव्हते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
या वाघाची कातडी जतन करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. यामुळे शवविच्छेदनानंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.