पोलीस भरतीदरम्यान दोघांचा मृत्यू
By admin | Published: June 12, 2014 03:05 AM2014-06-12T03:05:57+5:302014-06-12T03:05:57+5:30
मालेगावहून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या अंबादास सोनावणे (वय २७) याचा चाचणीदरम्यान मृत्यू झाला.
मुंबई : मालेगावहून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या अंबादास सोनावणे (वय २७) याचा चाचणीदरम्यान मृत्यू झाला. मैदानी चाचणीत चार कि.मी.चे अंतर धावल्यानंतर अंबादास कोसळला. त्याला सायन रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलिस भरतीसाठी आलेल्या साईप्रसाद माळी याला भरतीदरम्यान चक्कर आली. त्याला वाशीतील रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. त्याला डेंग्यू झाला होता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विक्रोळी ते घाटकोपर येथील पूर्वदु्रतगती मार्गावर पोलीस भरतीची चाचणी सुरू होती. अंबादासला सकाळी दहाच्या सुमारास चार किलोमीटरचे अंतर त्याने कापले. मात्र त्यानंतर तो खाली कोसळला. आणि त्याची शुद्ध हरपली. पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी उष्माघाताचा अंदाज व्यक्त को आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ऐरोली येथील भरतीसाठी जळगाव येथून साईप्रसाद माळी (वय १९) हा तरुण तेथे आला होता. ८ जून रोजी मैदानी चाचणीदरम्यान माळी याला भरती प्रक्रियेच्या मैदानावरच चक्कर आली होती. (प्रतिनिधी)