लोकलच्या ध़डकेत मुलाचा मृत्यू, सॅंडहर्स्ट रोडवर प्रवाशांचे रेल रोको

By admin | Published: February 16, 2016 01:55 PM2016-02-16T13:55:53+5:302016-02-16T14:16:30+5:30

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर संतप्त स्थानिकांनी रेल रोको आंदोलन सुरु केल्याने सीएसटी ते भायखळया दरम्यान रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.

The death of the boy in the local area, stop passengers' train on Sandhurst Road | लोकलच्या ध़डकेत मुलाचा मृत्यू, सॅंडहर्स्ट रोडवर प्रवाशांचे रेल रोको

लोकलच्या ध़डकेत मुलाचा मृत्यू, सॅंडहर्स्ट रोडवर प्रवाशांचे रेल रोको

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - लोकलची धडक लागून मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केल्याने मध्यरेल्वे मार्गावरील सीएसटी ते भायखळया दरम्यान रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. 
गौरव व्होरा या १३ वर्षाच्या मुलाचा सॅंण्डर्हस्ट रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून मृत्यू झाला. हा मुलगा शाळेतून घरी येत होता. अपघातानंतर या मुलाला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
या मुलाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर इथली स्थानिक जनता मोठया संख्येने रुळावर उतरली व त्यांनी रेल्वे ब्रिजच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. 
रेल्वे ब्रिज नसल्यामुळे इथे रहाणा-या स्थानिक नागरीकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. इथले स्थानिक नागरीक अनेक वर्षांपासून रेल्वे ब्रिजची मागणी करत आहेत. सँडहर्स्ट रोड स्थानकात झालेला हा पहिला अपघात नाही. 
यापूर्वीही अनेकांना रेल्वेब्रिज अभावी रेल्वे रुळ ओलांडताना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळेच संपप्त झालेल्या स्थानिक जनतेने रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन सुरु केले. आंदोलन करणा-यांना रुळावरुन हटवण्यात आल्याची माहिती आहे. 
 

Web Title: The death of the boy in the local area, stop passengers' train on Sandhurst Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.