फटाक्यातील रॉकेट गळ्याजवळ फुटल्याने मुलाचा मृत्यू

By admin | Published: May 27, 2017 05:08 PM2017-05-27T17:08:39+5:302017-05-27T17:10:22+5:30

फटाक्यातील रॉकेट गळ्याजवळ फुटल्याने तेरा वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाला. ही घटना क-हाड तालुक्यातील कालवडे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

The death of the child caused by cracking fire at rocket necklace | फटाक्यातील रॉकेट गळ्याजवळ फुटल्याने मुलाचा मृत्यू

फटाक्यातील रॉकेट गळ्याजवळ फुटल्याने मुलाचा मृत्यू

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
 
क-हाड, दि. 27 - फटाक्यातील रॉकेट गळ्याजवळ फुटल्याने तेरा वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाला. ही घटना क-हाड तालुक्यातील कालवडे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. आदित्य शामराव थोरात असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कालवडे येथील आदित्य थोरात हा मुलगा मलकापुरातील रोटरी शाळेमध्ये शिक्षण घेत होता. नुकतीच त्याने आठवीची परिक्षा दिली असून त्यामध्ये तो चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला आहे. सध्या ऊन्हाळ्याची सुटी असल्याने आदित्य दिवसभर घरीच असायचा. शुक्रवारीही तो दिवसभर घरी होता. त्यादिवशी नजीकच राहणा-या एका व्यक्तीचा वाढदिवस असल्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
आदित्यही त्याठिकाणी गेला होता. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाढदिवस साजरा झाल्यानंतर युवकांनी फटाके फोडण्यास सुरूवात केली. त्यावेळी आदित्यने फटाक्यातील एक रॉकेट उडवले. संबंधित रॉकेट उडून आकाशात फुटले. त्यानंतर आदीत्यने दुस-या रॉकेटची वात पेटवली. मात्र, बराच वेळ थांबूनही रॉकेट उडाले नाही. त्यामुळे आदित्य रॉकेटजवळ गेला. वात विझली का?, हे पाहण्यासाठी तो खाली वाकला. मात्र, त्याचवेळी रॉकेट उडाले. ते आदीत्यच्या गळ्याजवळ जाऊन फुटले. त्यामुळे आदीत्य भाजून गंभीररीत्या जखमी झाला.
हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाईक व परिसरातील ग्रामस्थांनी आदीत्यला तातडीने उपचारार्थ रूग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद क-हाड तालुका पोलिसात झाली आहे.

Web Title: The death of the child caused by cracking fire at rocket necklace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.