लसीकरणादरम्यान बालिकेचा मृत्यू

By admin | Published: November 13, 2015 12:38 AM2015-11-13T00:38:14+5:302015-11-13T00:38:14+5:30

लक्ष्मी पूजनाच्या पूर्व संध्येला येथे शासकीय लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. मात्र लस दिल्यानंतर अवघ्या काही तासात लक्ष्मी नामक दोन महिन्याच्या चिमकुलीचा मृत्यू झाला.

The death of the child during vaccination | लसीकरणादरम्यान बालिकेचा मृत्यू

लसीकरणादरम्यान बालिकेचा मृत्यू

Next

वरोरा : लक्ष्मी पूजनाच्या पूर्व संध्येला येथे शासकीय लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. मात्र लस दिल्यानंतर अवघ्या काही तासात लक्ष्मी नामक दोन महिन्याच्या चिमकुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाच्या लसीकरण कार्यक्रमाची धास्ती घेतली आहे. सदर घटना वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोणार गावात घडली.
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोणार गावात कोसरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बालकांसाठी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथील कर्मचारी सहभागी झाले होते. लोणार गावात लक्ष्मी शंकर बोधे या दोन महिन्यांच्या बालिकेसह पाच बालकांना लसीकरण करण्यात आले.
लस दिल्यानंतर अर्ध्या तासात लक्ष्मीची प्रकृती बिघडली. तिला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष्मीला मृत घोषित केले. लक्ष्मीचा मृत्यू लसीकरणाने झाल्याची तक्रार शेगाव पोलिसात करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू उपलब्ध नसल्याने तिचे शवविच्छेदन चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले. लसीकरण झाल्यानंतर लक्ष्मीचा मृत्यू झाल्याची तक्रार प्राप्त होताच आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली आहे.
संबंधिताचे बयाण नोंदविले आहे. लसीकरणानंतर लक्ष्मीचा मृत्यू झाल्याने ग्रामीण भागात लसीकरणाबाबत भीती व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The death of the child during vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.