ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणा-या चीनी आरोपीचा मृत्यू , २९ आॅगस्टला मृत्यू झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:49 AM2017-09-07T03:49:40+5:302017-09-07T03:50:35+5:30
हिरेचोरीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चिनी नागरिकाचा २९ आॅगस्टला मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
ठाणे : हिरेचोरीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चिनी नागरिकाचा २९ आॅगस्टला मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बुधवारी शवविच्छेदनानंतर त्याच्या नातेवाइकांना त्याचा मृतदेह ताब्यात दिला असून त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नसल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.
जियांग चांगकिंग (४८) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह आणखी एकाला मुंबईतील वनराई पोलिसांनी १ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात २ आॅगस्टला केली. २९ आॅगस्टला कारागृहात सकाळी जियांग जेवणासाठी रांगेत उभा होता. त्यावेळी अचानक कोसळला. त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी ठाणेनगर पोलीसांत आकस्मिक मृत्यची नोंद केली. त्याच्या मृत्यूची बातमी ठाणे पोलिसांनी चीन दूतावासाला दिल्यानंतर नातेवाईक येईपर्यंत शवविच्छेदन करू नये, अशी विनंती केली. त्यानुसार, त्याचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात ठेवला होता.