सोलापूरात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्याचा मृत्यू
By admin | Published: August 23, 2016 11:07 PM2016-08-23T23:07:40+5:302016-08-23T23:14:26+5:30
कचरेवाड़ी (ता़ मंगळवेढा )रसत्यालगत असलेल्या मुलाण वड्याजवळील वीट भट्टी नजीक शेतात राहणारे फैजुद्दीन साहेब हुसेन खतीब (वय ८२) आणि शाबेरा फैजुद्दीन खतीब (वय ७५) यांचा
Next
>ऑनलाइन लोकमत
मंगळवेढा, दि. 23 - कचरेवाडी रस्त्यालगत असलेल्या मुलाण वड्याजवळील वीट भट्टी नजीक शेतात राहणारे फैजुद्दीन साहेब हुसेन खतीब (वय ८२) आणि शाबेरा फैजुद्दीन खतीब (वय ७५) यांचा अज्ञात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली़. याबाबतची फिर्याद मयत दाम्पत्याचा मुलगा रियाज फैजुद्दीन खतीब याने मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये दिली़.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील मयत हे गेल्या पंधरा वर्षा पासून आपल्या शेतामध्ये राहत होते. नेहमी प्रमाणे सोमवारी रात्री जेवण करुन ते झोपले होते. मंगळवारी जेवण देण्यासाठी गेलेल्या व्यक्तिस शेतात फैजुद्दीन साहेबहुसेन खतीब आणि शाबेरा फैजुद्दीन खतीब हे मयत असलेल्या अवस्थेत आढळून आले.
शेतातील वस्तीवर राहत असल्याने कोणत्या तरी जंगली प्राण्याने डोक्याचा चावा घेवून जखमी झाल्याने ते जागीच मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही घटना संशयास्पद असून या मागे कोणत्यातरी कारणाने घातपात झाला असल्याची चर्चा शहरात होत आहे.
दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डूबले , स्थानिक गुन्हे शाखेचे विजय कुंभार यांनी भेट दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक अभिषेक डाके करीत आहेत.