पालघरमध्ये खड्ड्यामुळे महिला बाईक रायडरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 10:58 AM2017-07-24T10:58:30+5:302017-07-24T10:58:30+5:30
पालघरमधील वेती गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका महिला बाईक रायडरचा मृत्यू झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. 24 - रस्त्यावरील खड्ड्यामुळे महिला बुलेट रायडर जागृती होगाळेचा मृत्यू झाला आहे. मूळची मुंबईची असलेली जागृती होगाळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वेती गावाजवळ रायडिंग करत होती. यावेळी खडड्यामुळे जागृतीची 350 सीसी रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड आदळली व ती खाली पडली. या अपघातात जागृती ट्रकखाली चिरडली गेल्यानं ती गंभीर स्वरुपात जखमी झाली.
यावेळी तिच्यासोबत असलेल्या दोन बाईक रायडर्संनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. जागृतीच्या पश्चात पती विराज आणि 9 वर्षांचा मुलगा आहे.
आणखी बातम्या वाचा
दरम्यान, गृहिणी असलेल्या जागृतीनं महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक खडतर वाटांवर रायडिंग केले आहे. लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत जागृतीनं प्रवास केला होता. मुंबईतील मोरया ढोल ताशा पथकाची ती सदस्य होती.
Maharashtra: Woman biker killed as tyre got stuck in a pothole, following which she fell and was run over by a truck in Palghar (July 23) pic.twitter.com/AAZgdtsrPH
— ANI (@ANI_news) July 24, 2017