नाशिकमध्ये कार आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू
By admin | Published: June 22, 2016 08:19 PM2016-06-22T20:19:57+5:302016-06-22T23:10:27+5:30
बकेश्वर रोडवरील महिरावणीजवळील आय-20 कार व दुचाकी यांच्यात मंगळवारी (२१) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला.
नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरावणीजवळील आय-20 कार व दुचाकी यांच्यात मंगळवारी (२१) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लहानू पांडुरंग बेंडकुळे (२५, रा. खंबाळे, ता. त्र्यंबक) या युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला.
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महिरावणीजवळील महिंद्र अॅण्ड महिंद्र गुदामासमोर लहानु बेंडकुळे यांची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५, एसए ९४८) व पद्माकर देवीदास देवरे (५२, रा़महात्मानगर, नाशिक) यांच्या आय 20 कारमध्ये (एचएच १५, सीएम २०१८) अपघात झाला़ यामध्ये दुचाकीवरील लहान बेंडकुळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम सातपरू डॉक़राड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांचे वडील पांडुरंग बेंडकुळे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ठाकरे यांनी तपासून मयत घोषित केले. या अपघाताची त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.