२००६च्या मुंबई स्फोटांतील जखमी पराग सावंतचा ९ वर्षांनी मृत्यू
By admin | Published: July 7, 2015 10:44 AM2015-07-07T10:44:13+5:302015-07-07T10:55:26+5:30
मुंबईत ११ जुलै २००६ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटात जखमी झालेले पराग सांवत यांचा अखेर आज मृत्यू झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - मुंबईत ११ जुलै २००६ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटात जखमी झालेले पराग सांवत यांचा अखेर आज मृत्यू
झाला आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेले सावंत गेल्या ९ वर्षांपासून कोमात होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
११ जुलै रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एकामागोमाग एक असे साखळी स्फोट झाले होते. त्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्या जखमींपैकीच एक असलेले पराग सावंत यांच्यावर उपचार सुरू असताना ते कोमात गेले. गेल्या ९ वर्षांपासून ते कोमातच होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्यावेली बाँबस्फोट झाला तेव्हा पराग एक चांगलं जीवन जगत होते, त्यांची पत्नी गरोदर होती. मात्र स्फोटानंतर सावंत कुटुंबियांचे आयुष्यच बदललं. पराग यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला, पण पराग तिला कधीच पाहू शकले नाहीत. त्यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला.
दरम्यान या दुर्दैवी घटनेला तब्बल नऊ वर्ष उलटून गेल्यावरही या स्फोटातील दोषींना शिक्षा झालेली नाही.