शिक्षकांच्या मोर्चावरील लाठीमारानंतर पोलिसाचा मृत्यू

By Admin | Published: October 4, 2016 10:15 PM2016-10-04T22:15:33+5:302016-10-04T22:15:33+5:30

मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमारानंतरच्या धावपळीत पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

Death of policeman after lathicharges on teacher's rally | शिक्षकांच्या मोर्चावरील लाठीमारानंतर पोलिसाचा मृत्यू

शिक्षकांच्या मोर्चावरील लाठीमारानंतर पोलिसाचा मृत्यू

googlenewsNext
dir="ltr">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.04 -  मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमारानंतरच्या धावपळीत पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मुंबईहून आलेल्या या कर्मचा-याचा मृत्यू हदयविकाराने झाल्याचा अंदाज आहे.
राहुल प्रकाश कांबळे (५३, बक्कल नंबर १६२०) असे मरण पावलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. कांबळे हे मुंबईतील बोरिवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते.  मंत्रिमंडळ बैठकीच्या बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी राज्यभरातील पोलीस कर्मचारी औरंगाबादेत आले होते. आमखास मैदानाजवळ  पोहेकॉ. राहुल कांबळे हे अन्य अधिकारी, कर्मचा-यांसह तैनात होते. राज्यातील कायम विनाअनुदानित शिक्षक संघटनेचा मोर्चा आमखास मैदानासमोर अडविण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक रस्त्यावरच ठिय्या मांडून होते. सुमारे चार तास बसून असलेल्या शिक्षकांनी अग्निशामक दलाची गाडी अडवल्यानंतर पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. या वादानंतर पोलिसांनी लाठीहल्ला सुरू करताच मोर्चेकºयांनी दगड भिरकावले. या धावपळीत पोहेकॉ कांबळे यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते फूटपाथवर जाऊन
बसले आणि तेथेच बेशुद्ध झाले. तेथे तैनात असलेल्या शासकीय अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोहेकॉ कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, सहायक आयुक्त रविकांत बुवा यांनी घाटीत धाव घेतली.  या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना कळविण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले. 

Web Title: Death of policeman after lathicharges on teacher's rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.