स्वाइन फ्लूने पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By admin | Published: August 10, 2016 01:36 PM2016-08-10T13:36:52+5:302016-08-10T13:37:38+5:30
शहरात थैमान घालण्या-या स्वाइन फ्लूने पुण्यात मंगळवारी (दि.9) पंढरपूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १० - आठ वर्षापूर्वी शहरात थैमान घालण्या-या स्वाइन फ्लूने पुण्यात मंगळवारी (दि.9) पंढरपूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. 68 वर्षे वय असलेल्या या रूग्णावर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या या रूग्णास 11 जुलै रोजी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमूने तपासणीस पाठविण्यात आल्यनंतर 12 जुलै रोजी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरू होते.
आठ महिन्यात 9 मृत्यू
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहीती नुसार, 1 जानेवारी ते 10 आॅगस्ट 2016 अखेर शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सुमारे 9 जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यात तीन नागरिक पुणे महापालिका हददीतील असून इतर सहा नागरिक पालिकेच्या हददीबाहेरील आहेत. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये तसेच नागरिकांमध्येही पालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे.