अंकुर पनवारला फाशीची शिक्षा

By admin | Published: September 9, 2016 05:48 AM2016-09-09T05:48:21+5:302016-09-09T05:48:21+5:30

एकतर्फी प्रेमातून आणि आकसापोटी हरियाणाच्या प्रीती राठीवर अ‍ॅसिडहल्ला करून तिला ठार मारणारा तिचा शेजारी अंकुरलाल पनवार याला गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली

Death sentence for Ankur Panwar | अंकुर पनवारला फाशीची शिक्षा

अंकुर पनवारला फाशीची शिक्षा

Next

मुंबई : एकतर्फी प्रेमातून आणि आकसापोटी हरियाणाच्या प्रीती राठीवर अ‍ॅसिडहल्ला करून तिला ठार मारणारा तिचा शेजारी अंकुरलाल पनवार याला गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. अ‍ॅसिडहल्ला प्रकरणी देशातील ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे.
प्रीती राठीवर २ मे २०१३ रोजी वांद्रे टर्मिनसवर अ‍ॅसिडहल्ला झाला होता. अनेक अवयव निकामी झाल्याने १ जून २०१३ रोजी प्रीतीचा मृत्यू झाला.
विशेष महिला न्यायालयाच्या न्या. ए. एस. शेंडे यांनी मंगळवारी अंकुर पनवार (२६) यास भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या) व ३२६ (ब) (अ‍ॅसिड फेकणे) अंतर्गत दोषी ठरवले होते. गुरुवारी न्या. शेंडे यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अंकुरला याच कलमांतर्गत फाशीची शिक्षा ठोठावली. पनवारला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निकालावर उच्च न्यायालयात अपिलात जाण्यासाठी न्या. शेंडे यांनी त्याला एका महिन्याची मुदत दिली.
मुंबई पोलिसांनी पनवारवर तब्बल १,३३२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. तर सरकारी वकिलांनी खटल्यादरम्यान ३७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. साक्षीदारांमध्ये तिचे वडील अमरसिंग राठी यांचाही समावेश होता.
दरम्यान, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने राज्य सरकारला प्रीती राठीच्या पालकांना २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. तसेच अंत्यसंस्कारांचा खर्च म्हणून २ हजार रुपये देण्याचेही निर्देश दिले.


अ‍ॅसिडहल्ल्याप्रकरणी प्रथमच फाशी
दिल्लीच्या निर्भया केसनंतर आयपीसीमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यात महिलांवर
क्रूरपणे अ‍ॅसिडहल्ला करणाऱ्या नराधमांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली. याच तरतुदीच्या आधारावर गुरुवारी विशेष महिला न्यायालयाच्या न्या. ए. एस. शेंडे यांनी अंकुर पनवारला फाशीची शिक्षा ठोठावली. देशातील ही पहिलीच केस आहे.

विकृत मानसिकतेच्या लोकांवर जरब बसेल
अंकुरसारख्या विकृत मानसिकतेच्या लोकांवर या निर्णयामुळे जरब बसेल. भारतात महिलांची तुलना देवीशी करण्यात येते. मात्र तिच्यावरच अत्याचार करण्यात येतो. आता यापुढे अशा प्रकारचे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हा संदेश या निकालामुळे जनमानसात पोहोचेल. निर्भया केसनंतर आयपीसीमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यात अ‍ॅसिडहल्ला करणाऱ्यांनाही फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच केस आहे.
- अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील


पनवार-प्रीतीचा भाऊ कोर्टातच भिडले
पनवारला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली तेव्हा तो कमालीचा घाबरला. त्यानंतर रागाने जागेवरून उठत ही केस सीबीआयकडे वर्ग करा, असे मी वारंवार सांगत असल्याचे तो म्हणाला. तथापि, न्यायालयाने शिक्षेला एक वर्षाची स्थगिती दिल्यानंतर अंकुरच्या चेहऱ्यावरचा तणाव काही प्रमाणात दूर झाला. न्यायाधीश उठून चेंबरमध्ये गेल्यानंतर मात्र तो हसू लागला. त्याचे हसणे पाहून प्रीतीचा चुलत भाऊ हितेश वैतागला. ‘अभी हसले बाद मे तू बचेगा नहीं,’ असे हितेश म्हणाला. मात्र पनवारने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यातून उभे राहत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिव्या ऐकून हितेश पनवारवर धावून गेला आणि त्यास मारहाण केली. तेवढ्यात पोलीस धावून आले त्यांनी हितेशच्या कानशिलात लगावली आणि त्याला दूर केल

Web Title: Death sentence for Ankur Panwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.