दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Published: April 2, 2017 01:54 AM2017-04-02T01:54:18+5:302017-04-02T01:54:18+5:30

खामगावातील घटना; १६ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

Death of a student in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

Next

खामगाव, दि. १- अभ्यास करून मित्राला दुचाकीवरून घरी सोडून परतणार्‍या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा टॉवर चौकात घडली.
शहरातील पत्रकार राजकुमार गोयनका यांचा मुलगा मधुर (वय १६) हा येथील एसएसडीव्ही शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. सीबीएससी पॅटर्न असलेल्या दहावीची येत्या ८ एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून मधुर हा शनिवारी त्याच्या घरी हर्षल जोशी आणि मुकुंद अग्रवालसह अभ्यास करत होता. रात्री दरम्यान अभ्यास पूर्ण झाल्याने तो मित्र मुकुंद यास त्याच्या घरी रायगड कॉलनीमध्ये सोडण्यासाठी गेला होता, त्यावेळी तो आणि त्याचा मित्र हर्षल हे दुचाकी क्र.एमएच३0-एस ७१९६ ने घरी परतत असताना टॉवर चौकमधून नांदुर्‍याकडे भरधाव जाणार्‍या ट्रक क्र.एमएच ३0 झेड-१९११ ने मधुरच्या दुचाकीस समोरून धडक देऊन त्यास चिरडले. या दुर्दैवी अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मित्र हर्षल हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक आणि ट्रकचालकास ताब्यात घेतले. या घटनेमुळे गोयनका कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. मधुर हा मनमिळावू स्वभावाचा म्हणून सर्वांमध्ये परिचीत होता.

Web Title: Death of a student in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.