कोल्हापूरजवळ भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू

By Admin | Published: July 3, 2016 04:26 PM2016-07-03T16:26:05+5:302016-07-03T19:11:54+5:30

या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उपचारादरम्यन ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे मृत्यूचा आकडा ७ वर गेला आहे. या अपघातात २३ जण गंभीर जखमी झाले आहेत

Death toll in Kolhapur, 7 deaths | कोल्हापूरजवळ भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू

कोल्हापूरजवळ भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ३ : इचलकरंजी येथून रक्षाविसर्जन करुण कोल्हापूरला येत असताना माले फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमिक माहीतीतून समोर आले आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उपचारादरम्यन ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे मृत्यूचा आकडा ७ वर गेला आहे. या अपघातात २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची आवस्था पाहता मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोंडीबा पांडू चौगलेयांच्यासह अन्य ३ जणांचार सीपीआर मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.  कोल्हापूर जवळील सादळे मादळे येथिल राहणारे एक कुटंबिय महिद्रा पिक अपने इचलकरंजीतून आपल्या घराकडे परतत असताना काळाने हा घात केला. पिक अप MH 09 CU 6388 असा क्रमांक आहे. मृताची नावे 1) कोडीबा पांडूरंग पोवार 2) विलास शकर कोपाडेॅ 3) पूतळावाई   बाळू पोवार 4) रतनाबाई रंगराव पोवार 5) कोंडीबा  पांडू  चौगले 6) नामदेव  बापू पोवार 7) पाव॔ती शंकर  चोगले , हे सर्व 55 ते 60  वयोगटातील आहेत. 
 
जखमीवर सी पी आर मध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त ठिकाणी लोकांची गर्दी झाली. काहीनी अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. अपघाताची माहीती मिळताच पोलिस घटणास्थळी पोहचले आहेत. हा अपघात ऐवढा भीषण होता कि महिद्रा पिक अप रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ओढ्यात जाऊन पडली. अपघाताच्या ठिकाणी कुटुंबियानी एकचं आक्रोश केला आहे.
 
सीपीआर मधील सलाईनचा साठा संपल्यामुळे जखमींना प्रथमिक उपचारानंतर कोल्हापूरच्या खाजगी रुगणालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. करवीर येथिल आमदार अपघाग्रस्तांच्या पाहणीसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

 

Web Title: Death toll in Kolhapur, 7 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.