आईने पेटवून घेतल्याने दोघा चिमुरड्यांचा मृत्यू
By admin | Published: May 9, 2014 08:57 AM2014-05-09T08:57:07+5:302014-05-09T08:57:07+5:30
किरकोळ वादातून पत्नीने दोन मुलांसह स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने दोघा चिमुरड्यांचा करुण अंत झाला. त्यांची आई ९0 टक्के भाजली असून, ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Next
पुणे : किरकोळ वादातून पत्नीने दोन मुलांसह स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने दोघा चिमुरड्यांचा करुण अंत झाला. त्यांची आई ९0 टक्के भाजली असून, ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील शिनगारवाडी येथे हा प्रकार घडला.
कार्तिक दिलीप खामकर (वय ५ वर्षे) आणि श्रद्धा दिलीप खामकर (वय दीड वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. त्यांची आई सुरेखा या ९0 टक्के भाजल्या आहेत.
पोलिसांनुसार, खामकर कुटुंबीय मंगळवारी वाडेगव्हाण येथे नातेवाइकांकडे यात्रेसाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्यात भांडणे झाली. रात्री घरी जाईपर्यंत त्यांची भांडणे सुरू होती. रात्री पती दिलीप हे बाहेर गेल्यावर सुरेखा यांनी स्वत:सह दोन्ही मुलांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. दिलीप परत आल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी तिघांनाही पुण्यात आणून ससून रुग्णालयात दाखल केले. काल सायंकाळी सात वाजता श्रद्धाचा मृत्यू झाला; तर मध्यरात्री कार्तिकचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी) शिरूर तालुक्यातील शिनगारवाडीतील घटना : पती-पत्नीतील किरकोळ भांडणातून प्रकार