भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

By admin | Published: July 17, 2016 07:53 PM2016-07-17T19:53:05+5:302016-07-17T19:53:05+5:30

भरधाव मोटारीची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास भांडारकर रस्त्यावर घडला

Death of a two-wheeler in a car with a speeding car | भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ : भरधाव मोटारीची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास भांडारकर रस्त्यावर घडला. अपघातानंतर पळून जात असलेल्या चालकाला नागरिकांनी पाठलाग करुन पकडले. जखमी महिलेला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. ही मोटार कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर चालवित होते अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले यांनी दिली.
अरुंधती गिरीष हसबनीस (वय 27, रा. विलोचन रेसिडेन्सी, न-हे) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर (वय 70) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विक्रम सुशील धुत (वय 35, रा. इंद्रजीत अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुंधती या पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी करतात. तर त्यांचे पती एका संगणक कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांना अडीच वर्षांचा ओजस नावाचा मुलगा आहे. रविवारी दुपारी अरुंधती त्यांच्या दुचाकीवरुन भांडारकर रस्त्यावरुन मैत्रीणीकडे जात होत्या. लॉ कॉलेज रस्त्याकडून त्या गुडलक हॉटेलच्या दिशेने जात होत्या.
त्याच वेळी पाठीमागून अभ्यंकर त्यांच्या मोटारीमधून पत्नीसह गुडलक चौकाच्या दिशेने जात होते. ते स्वत: चालवीत असलेल्या भरधाव मोटारीची अरुंधती यांच्या दुचाकीला धडक बसली. भांडारकर रस्त्यावरील बँक आॅफ बडोदासमोर झालेली ही धडक एवढी जोरात होती की अरुंधती रस्त्यावर जोरात आदळल्यामुळे हेल्मेटही तुटले. हेल्मेट असूनही त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. अपघातानंतर आयसीआयसीआय बँकेच्या बोळामधून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाठीमागून येत असलेल्या पोलिसांसह नागरिकांनी अभ्यंकर यांना पकडले. दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती कळवून कौस्तुभ अण्णाराव तांभाळे (वय 23, रा. नंदादीप अपार्टमेंट, पत्रकारनगर, गोखलेनगर) यांनी अरुंधती यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अभ्यंकर यांना ताब्यात घेतले. त्यांची मोटार आणि अपघातग्रस्त दुचाकी प्रभात पोलीस चौकीमध्ये आणण्यात आली. दरम्यान, अरुंधती यांच्या पतीला अपघाताची माहिती कळवण्यात आली. त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
=========
मी गुडलक चौकाकडून लॉ कॉलेजच्या दिशेने मोटारीमधून जात होतो. बँक आॅफ बडोदापासून थोडे पुढे गेल्यावर पाठीमागून आलेल्या एका नागरिकाने मला एक महिला दुचाकी घसरुन पडली असून पाठीमागे अपघात झाल्याचे सांगितले. मी मोटार वळवून पाठीमागे जाऊन पहात असताना नागरिकांनी मलाच पकडले. पोलीस आल्यावर ते मला पोलीस चौकीमध्ये घेऊन आले. मी अपघात केलेला नाही.
- मुकुंद अभ्यंकर

Web Title: Death of a two-wheeler in a car with a speeding car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.