दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाण्याच्या रांगेतच महिलेचा मृत्यू
By admin | Published: May 4, 2016 08:52 AM2016-05-04T08:52:48+5:302016-05-04T08:52:48+5:30
दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरमध्ये पाण्यासाठी दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
लातूर, दि. 04 - दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरमध्ये पाण्यासाठी दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. केवलबाई कांबळे असं या महिलेचं नाव आहे. पाण्यासाठी दोन तासाहून जास्त वेळ त्या रांगेत उभ्या होत्या. कडक उन्हामध्ये जास्त वेळ उभे राहिल्याने चक्कर येऊन त्या खाली पडल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. चाकूर तालुक्यातील ही घटना आहे.
केवलबाई कांबळे पाणी भरण्यासाटी बोअरवेलवर गेल्या होत्या. पण कडक उन्हामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.
अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपुर्वी बीडमध्ये पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेलेल्या 11 वर्षाय मुलाचा मृत्यू झाला होता. तर 12 वर्षीय मुलीचा पाणी भरण्यासाठी उन्हातूम फे-या मारताना हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला होता.
Latur (Maharashtra): A woman died while standing in water queue in drought hit village, say locals (03/05/16) pic.twitter.com/mCxFVYRdwZ
— ANI (@ANI_news) May 4, 2016