सेल्फी काढण्याच्या नादात खंडाळा घाटात पडून तरूणाचा मृत्यू

By Admin | Published: June 22, 2016 01:21 PM2016-06-22T13:21:13+5:302016-06-22T13:53:28+5:30

सेल्फीचे तरूणाईला लागलेले वेड दिवसेंदिवस घातक ठरत असून खंडाळा घाटातील अमृतांजन पुलावरून सेल्फी काढताना तोल जाऊन पडल्याने एका महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू झाला

The death of the young man fell in Khandala Ghat in the name of selfe removal | सेल्फी काढण्याच्या नादात खंडाळा घाटात पडून तरूणाचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात खंडाळा घाटात पडून तरूणाचा मृत्यू

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
खंडाळा, दि. २२ - सेल्फीचे तरूणाईला लागलेले वेड दिवसेंदिवस घातक ठरत असून खंडाळा घाटातील अमृतांजन पुलावरून सेल्फी काढताना तोल जाऊन पडल्याने एका महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू झाला आहे. तनवेल कदम (वय- 20,  रा. मालेगाव, नाशिक) असे त्या युवकाचे नाव आहे. सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षाला शिकणारा तनवेल हा बुधवारी सकाळी खंडाळा घाटातून जात असताना सेल्फी काढण्यासाठी खाली उतरला. मात्र सेल्फी काढण्याच्या नादात तो अमृतांजन पुलावरून पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पडला व त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

Web Title: The death of the young man fell in Khandala Ghat in the name of selfe removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.