डेब्रिज माफियांचा शेतकरी कुटुंबावर हल्ला

By admin | Published: April 8, 2017 04:11 AM2017-04-08T04:11:41+5:302017-04-08T04:11:41+5:30

अडवली भुतावलीमध्ये डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी स्थानिक शेतकरी कुटुंबावर डंपर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला

Deborrage mafia farmer family attack | डेब्रिज माफियांचा शेतकरी कुटुंबावर हल्ला

डेब्रिज माफियांचा शेतकरी कुटुंबावर हल्ला

Next

नामदेव मोरे,
नवी मुंबई- अडवली भुतावलीमध्ये डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी स्थानिक शेतकरी कुटुंबावर डंपर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नशिबाने वाचलेल्या कुटुंबाने तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. सकाळी १२ वाजता अनधिकृत भराव करणारा डंपर पकडून व अधिकाऱ्यांना फोन करूनही एकही अधिकारी तिकडे फिरकला नसल्याने डेब्रिजविरोधी पथकाचाच माफियांना पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
खैरणे-बोनकोडे येथे राहणारे विजय नाईक यांची अडवली गावच्या हद्दीमध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या परिसरातील बहुतांश जमीन मोठ्या उद्योगपतींनी विकत घेतली आहे. ज्यांनी जमीन विकली नाही त्यांनाही ती विकण्यास भाग पाडली आहे. नाईक परिवारालाही जमीन विकण्यासाठी अनेकांनी संपर्क साधला होता; परंतु आमची वडिलोपार्जित जमीन असून आम्ही ती विकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. यामुळे नाईक कुटुंबीयांच्या जमिनीच्या चारही बाजूला डेब्रिज माफियांच्या मदतीने अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांमध्ये जवळपास दहा हजार डेब्रिज येथे खाली झाले असून मुंबई, ठाणेमधील बांधकामाच्या कचऱ्याचा नवीन डोंगर तयार झाला आहे.
नाईक कुटुंबीयांचे शेतघरही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यांच्या जमिनीकडे जाण्यास रस्ताच बंद करण्यात आला आहे. याविषयी दोन वर्षांपासून पालिकेकडे तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारींची दखल घेतली जात नाही. वारंवार पत्र दिल्यानंतरही डेब्रिजमाफिया बिनधास्तपणे भराव टाकत असून त्यांना राजकीय व प्रशासकीय आश्रय मिळत आहे.
शेतकरी नाईक कुटुंबीयांनी एक आठवड्यापूर्वी परिमंडळ दोनच्या डेब्रिज विरोधी पथकाला घटनास्थळी नेवून तेथील स्थिती दाखविली. यानंतरही भराव थांबला नाही. शुक्रवारी डेब्रिजचा भराव सुरू असताना विजय नाईक, त्यांचा मुलगा दर्शन व अमोल नाईक, सून मोनिका अमोल नाईक यांनी १२ वाजता डेब्रिजची गाडी अडविली. ज्या डंपरमधून वाहतूक सुरू होती त्यांना गोठेघर येथे मध्ये डेब्रिज टाकण्याची परवानगी आहे. गोठेघर हे फक्त नावासाठी असून प्रत्यक्षात डेब्रिज अडवलीच्या हद्दीमध्ये टाकले जात आहे. नाईक परवानाने डंपर अडविल्यानंतर परवानगीवरील फोननंबरवर संपर्क साधला; पण प्रत्यक्षात ते नंबरच चुकीचे असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर सायंकाळपर्यंत कोणीही आले नाही. डंपरचालकाने डंपर नाईक परिवारावर चालविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दर्शन नाईक जखमी झाला आहे. सायंकाळी उशिरा पालिकेचे पथक आले; पण त्यांनी डंपरवर कारवाई केली नाही. चालक चावी घेऊन पळून गेला असल्याचे कारण देण्यात आले. डेब्रिज माफियाच्या हल्ल्यात नाईक परिवारातील सदस्यांचा मृत्यू झाला असता तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
माफियांना अभय देणारे पथक
महापालिकेचे डेब्रिज विरोधी पथक हे प्रत्यक्षात डेब्रिज माफियांना अभय देणारे पथक बनले आहे. दोन वर्षे पाठपुरावा करूनही गांभीर्याने कारवाई कधीच करण्यात आलेली नाही. शुक्रवारी विजय नाईक व त्यांच्या परिवाराने जीव धोक्यात घालून डंपर अडविला. अधिकाऱ्यांना फोन केला असता, माझी पत्नी अजारी आहे, तीला दवाखान्यात घेऊन जायचे असल्याचे सांगितले. पत्नी अजारी असताना अधिकाऱ्यांनी सुट्टी का घेतली नाही व कर्तव्यावर असताना कारवाई न करता खासगी कामे करण्यावर का लक्ष देण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पथकामधील एक जबाबदार अधिकाऱ्याने गाडी नसल्याचे कारण देऊन कारवाई केली नाही यामुळे डेब्रिज माफियांना या पथकाचेच संरक्षण असल्याचे सिद्ध झाले आहे.
आमच्या शेतजमिनीच्या बाजूच्या भूखंडावर दोन वर्षांपासून भराव सुरू आहे. आम्ही तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. आमचे शेतघर पाडले आहे. शुक्रवारी डंपर अडविल्यामुळे माफियांनी कुटुंबीयांवर डंपर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भावाच्या पायावरून डंपरचे चाक केले. आमचा जीव गेल्यानंतर पालिका प्रशासन माफियांवर कारवाई करणार का ?
- अमोल नाईक,
शेतकरी, अडवली
खैरणे-बोनकोडे येथे राहणारे विजय नाईक यांची अडवली गावच्या हद्दीमध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या परिसरातील बहुतांश जमीन उद्योगपतींनी विकत घेतली आहे. ज्यांनी जमीन विकली नाही त्यांनाही ती विकण्यास भाग पाडली आहे.

Web Title: Deborrage mafia farmer family attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.