कर्जमाफी! परतफेड ३१ मार्च १८ पर्यंत!
By admin | Published: July 1, 2017 02:46 AM2017-07-01T02:46:32+5:302017-07-01T02:46:32+5:30
दीड लाख रुपयांवरील कृषी कर्जाची रक्कम फेडण्यासाठीची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०१८ ही असेल. त्यामुळे मोठ्या रकमेचे थकबाकीदार
यदु जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दीड लाख रुपयांवरील कृषी कर्जाची रक्कम फेडण्यासाठीची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०१८ ही असेल. त्यामुळे मोठ्या रकमेचे थकबाकीदार असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शुक्रवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
दीड लाख रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी ज्या शेतकऱ्यांकडे आहे. त्यांनी अधिकची रक्कम भरली तर दीड लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे २८ जून रोजी निघालेल्या कर्जमाफीच्या शासकीय आदेशात नमूद करण्यात आले होते. तथापि, ही अधिकची रक्कम कधीपर्यंत भरता येईल, याची कोणतीही मुदत त्या आदेशात देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला सांगितले की, या थकबाकीच्या परतफेडीची मुदत ही ३१ मार्च २०१८ असेल. दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शासनाने सरसकट माफ केले आहे. त्याचा फायदा ३६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
दीड लाखावर कर्ज असलेल्या ८ लाख शेतकऱ्यांना अधिकची रक्कम भरताना तजविज करता येण्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्यादृष्टीनेच पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जाणकारांच्या मते या निर्णयाने जसा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तसा कर्जमाफीच्या निर्णयाने आर्थिक बोजाखाली दबलेल्या सरकारवर एकाचवेळी दडपण येणार नाही. ३६ लाख शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देताना सरकारवर मोठा बोजा येईल. त्याचवेळी दीड लाखावरील थकबाकीदारांना दोन महिन्यांची मुदत दिली असती आणि त्या मुदतीत त्यांनी थकबाकी परत केली असती तर सरकारवर एकाचवेळी मोठा आर्थिक ताण पडला असता. ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत दिल्याने आता तसे होणार नाही.
‘त्या’ परतफेडीला मिळणार मुदतवाढ -
नियमित कर्ज परतफेड केल्यास २५ हजार रुपये वा थकबाकीच्या २५ टक्के यापैकी कमी असलेली रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून ज्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यांना परतफेडीची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे.
ही मुदत जूनअखेर होती. तरीही अनेक शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे शासन किमान एक महिन्याची मुदतवाढ देईल, अशी शक्यता आहे. या बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, या परतफेडीचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल.
२०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल, असे कर्जमाफीच्या आदेशात म्हटले होते.
शेतकरी कर्जमाफीत घेणार जनतेच्या देणग्या
राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात आपलेही योगदान असावे, या भावनेने विविध व्यक्ती आणि संस्था पुढे येत असताना आता अशा देणग्या स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खाते सुरू करण्यात आले आहे. संस्था आणि व्यक्तींनी दिलेली देणगी या खात्यामध्ये जमा केली जाणार असून ही रक्कम शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठीच उपयोगात आणली जाईल.
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून भारतीय स्टेट बँकेच्या फोर्ट येथील मुंबई मुख्य शाखेमध्ये उऌकएऋ टकठकरळएफर ऋअफटएफ फएछकएऋ ऋवठऊ या नावाने ३६९७७०४४०८७ क्रमांकाचे खाते उघडण्यात आले आहे.
या शाखेचा कोड ००३० आणि आयएफएससी कोड रइकठ ००००३०० असा आहे. या खात्यावर इच्छुक देणगीदारांना एनईएफटी अथवा धनादेशाच्या माध्यमातून पैसे जमा करता येतील.