‘बुडणाऱ्या बँकांसाठीच कर्जमाफी हवीय’

By admin | Published: July 15, 2015 12:21 AM2015-07-15T00:21:04+5:302015-07-15T00:21:04+5:30

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गलथान कारभारामुळे सहकारी बँका आणि सूतगिरण्या बुडवल्या आहेत. त्यासाठीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, असा आरोप

'Debt Waiver for Dinged Banks' | ‘बुडणाऱ्या बँकांसाठीच कर्जमाफी हवीय’

‘बुडणाऱ्या बँकांसाठीच कर्जमाफी हवीय’

Next

मुंबई : काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गलथान कारभारामुळे सहकारी बँका आणि सूतगिरण्या बुडवल्या आहेत. त्यासाठीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, असा आरोप महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला.
संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांच्या गदारोळावर खडसे यांनी आक्षेप घेतला. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी करावयाच्या उपाययोजनांची चर्चेची मागणी केली आहे. सरकार चर्चेला तयार आहे. मात्र, विरोधकांनी चर्चाच करायची नाही. गदारोळ करण्याचे ठरवूनच ते सभागृहात आल्याचा आरोप खडसे यांनी केला. मागील कर्जमाफीचा फायदा केवळ पश्चिम महाराष्ट्राला झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी पोहोचलीच नाही. आघाडीच्या कारभारामुळे राज्यावर २ लाख ८५ हजार कोटींचे कर्ज असून, केवळ व्याजापोटी २४ हजार कोटी खर्चायची वेळ राज्यावर आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Debt Waiver for Dinged Banks'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.