कर्जमाफी 2 लाखापर्यंतच; त्यापेक्षा जास्त रक्कम असलेली शेतकरी अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 10:17 AM2019-12-28T10:17:38+5:302019-12-28T10:20:11+5:30

ज्या शेतकऱ्यांवर 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असेल त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Debt waiver of farmers with loans up to Rs 2 lakh | कर्जमाफी 2 लाखापर्यंतच; त्यापेक्षा जास्त रक्कम असलेली शेतकरी अपात्र

कर्जमाफी 2 लाखापर्यंतच; त्यापेक्षा जास्त रक्कम असलेली शेतकरी अपात्र

Next

मुंबई : विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र आता ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे सरकारने केलेली कर्जमाफी फक्त 2 लाखांपर्यंत  कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकरी अपात्र राहणार आहे.

ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयात केलेल्या उल्लेखा नुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 .09.2019 पर्यंत थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांवर 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असेल त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

Web Title: Debt waiver of farmers with loans up to Rs 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.