चुकून पाकिस्तानात गेलेला जवान मूळचा महाराष्ट्रातील, धक्क्याने आजीचे निधन

By admin | Published: September 30, 2016 12:45 PM2016-09-30T12:45:09+5:302016-09-30T13:21:46+5:30

चुकून LOC पार करून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला चंदू बाबूलाल चव्हाण हा महाराष्ट्रातील असून तो धुळ्याचा रहिवासी आहे.

The deceased jawan, originally from Pakistan, died in Maharashtra | चुकून पाकिस्तानात गेलेला जवान मूळचा महाराष्ट्रातील, धक्क्याने आजीचे निधन

चुकून पाकिस्तानात गेलेला जवान मूळचा महाराष्ट्रातील, धक्क्याने आजीचे निधन

Next
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. ३० - चुकून LOC पार करून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला चंदू बाबूलाल चव्हाण हा महाराष्ट्रातील असून तो धुळ्याचा रहिवासी आहे. त्याला पकडल्याचे दुर्दैवी वृत्त समजताच त्याच्या आजीचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. 
बुधवारी मध्यरात्री भारताच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत  ३८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र याच स्ट्राईकदरम्यान पाकिस्तानने भारताच्या एका जवानाला पकडल्याचे वृत्त आले. चंदू बाबूलाल चव्हाण (२२) असे पकडले गेलेल्या जवानाचे नाव असून तो धुळ्यातील सामनेर ता पाचोरा येथील रहिवासी  आहे. मात्र आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे लहानपणापासूनच तो मोठया भावासोबत आजोळी बोरविहीर येथे राहत होता. त्याचा मोठा  भाऊ भूषण हा देखील भारतीय सैन्यात जामनगर येथे कार्यरत आहे. गुरुवारी रात्री भूषणला चंदू पाकिस्तानच्या तावडीत सापडल्याची बातमी कळली मात्र ही दुर्दैवी बातमी त्याने आजी लीलाबाई चिधु पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
(एका भारतीय जवानाला पकडल्याचा पाकचा दावा)
 
  •  
 
 

 

Web Title: The deceased jawan, originally from Pakistan, died in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.