डिसेंबरपर्यंत १५०० ‘शिवशाही’ एसटीच्या सेवेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:18 AM2017-08-12T04:18:01+5:302017-08-12T04:18:27+5:30

एसटीची अद्ययावत आणि वातानुकूलित अशी ओळख असलेल्या शिवशाहीच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. जीएसटीमुळे बस पुरवठादार कंपन्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

By December 1500 'Shivshahi' ST services | डिसेंबरपर्यंत १५०० ‘शिवशाही’ एसटीच्या सेवेत  

डिसेंबरपर्यंत १५०० ‘शिवशाही’ एसटीच्या सेवेत  

Next

मुंबई : एसटीची अद्ययावत आणि वातानुकूलित अशी ओळख असलेल्या शिवशाहीच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. जीएसटीमुळे बस पुरवठादार कंपन्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा संभ्रम दूर झाला आहे. डिसेंबरपर्यंत भाडेतत्त्वावर १ हजार ५०० शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या सर्व बसेस भाडेतत्त्वावरील बसेस असून, महामंडळ स्वत: ५०० बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे शिवशाही बसेसची संख्या दोन हजार होईल.

शिवशाही बसची कंत्राट पद्धती ‘पारदर्शक’ राहण्यासाठी वेगवेगळ््या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. डिसेंबरअखेर भाडेतत्त्वावरील १ हजार ५०० बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. संबंधित बस पुरवठा करणारी कंपनी ही भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या शिवशाही बससाठी चालक देणार आहे. या बसमध्ये वाहक म्हणून एसटी कर्मचारी कर्तव्यावर असतील.

Web Title: By December 1500 'Shivshahi' ST services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.