‘पाचवी, आठवी परीक्षांबाबत लवकरच निर्णय’

By admin | Published: April 2, 2017 01:29 AM2017-04-02T01:29:15+5:302017-04-02T01:29:15+5:30

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे

Decision about 'Fifth and Eighth Examinations' | ‘पाचवी, आठवी परीक्षांबाबत लवकरच निर्णय’

‘पाचवी, आठवी परीक्षांबाबत लवकरच निर्णय’

Next

पुणे : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षांना सामोरे जावे लागू शकते,असे सूचक वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पुण्यात केले.
वन विभागातर्फे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात जावडेकर यांनी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याबाबत सर्व राज्यांशी संवाद साधला. सुमारे २५ राज्यांनी त्यास होकार दर्शविला असून काही राज्यांनी त्यासंदर्भातील निर्णय स्वत:च घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र,परीक्षा घेण्यासंदर्भातील कायदा केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर केला आहे.त्यावर लवकरच निर्णय होईल.परिणामी येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. (प्रतिनिधी)

Web Title: Decision about 'Fifth and Eighth Examinations'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.