‘मंत्रिमंडळात औषध खरेदीचा निर्णय’

By admin | Published: August 19, 2016 12:42 AM2016-08-19T00:42:50+5:302016-08-19T00:42:50+5:30

राज्यात औषध खरेदीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी येथे दिली.

'Decision to buy medicine in cabinet' | ‘मंत्रिमंडळात औषध खरेदीचा निर्णय’

‘मंत्रिमंडळात औषध खरेदीचा निर्णय’

Next

मुंबई : राज्यात औषध खरेदीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी येथे दिली.
आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री अशा दोघांनी पहिल्यांदाच एकत्रित पत्रकार परिषदघेतली. दोन्ही विभागातील हेवेदावे आणि तुमची खरेदी जास्त की खरेदीतले तुमचे ज्ञान जास्त या वादामुळे गेले अनेक वर्षे औषध खरेदी कायम वादात राहीलेली आहे. यावर उपाय म्हणून राज्यात कोणत्याही विभागाला लागणारी औषध खरेदी एकाच ठिकाणाहून व्हावी यासाठी औषध खरेदी
महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती.
त्यालाही आता काही महिने लोटले पण त्यावर काहीच घडत नाही. त्यामुळे याविषयी प्रश्न विचारला असता डॉ. सावंत म्हणाले, आमच्यात वाद नाहीत हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल. याविषयीचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाणार आहे, असे सांगितले तर औषध खरेदी महामंडळाची पूर्वतयारी झाली असून त्यावर महिनाभरात निर्णय होईल,असे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Decision to buy medicine in cabinet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.