पालघर जिल्ह्यातील चार दिवसांचा ड्राय डे रद्द ,हायकोर्टाचा निर्णय
By admin | Published: February 1, 2017 11:21 PM2017-02-01T23:21:40+5:302017-02-01T23:21:40+5:30
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने लागू केलेला चार दिवसांचा ड्राय डे उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1- कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने लागू केलेला चार दिवसांचा ड्राय डे उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला आहे. आता फक्त फोन दिवस ड्राय डे असणार आहे .
वसई तालुका हॉटेल असोसिएशनने याबाबत उच्च न्यायालयात धधाव घेतली होती. कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्याची मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी आणि ६ फेब्रुवारी असा ४ दिवसांचा ड्राय डे लागू करण्यात आला होता.
पालघर जिल्ह्यात २ हजार बार, वाईन शॉप आहेत. त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार होता. ३ फेब्रुवारीला मतदान आहे तर १ तारखेपासून ड्राय डे का असा सवाल त्यांनी केला होता. त्यामुळे वसई तालुका हॉटेल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली आणि न्यायालयाने हा ड्राय डे रद्द केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता केवळ मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते संध्या ६ वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंतच ड्राय डे राहणार आहे.
४ दिवसांचा ड्राय डे हा मूर्खपणा होता. एका बारला प्रतिदिवसी शासनाची फी अडीच हजार रुपये, बिल, कर्मचारी पगार मिळून १५ हजार रुपये खर्च असतो. तीन दिवसात त्यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असते. न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळाल्याचे, वसई तालुका हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश हेगडे यांनी सांगितले.