रात्री ‘क्लाऊड सिडिंग’चा निर्णय अधांतरीच
By admin | Published: September 1, 2015 01:56 AM2015-09-01T01:56:26+5:302015-09-01T01:56:26+5:30
मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंग (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) करण्यावर विचार करण्यास प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे
औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंग (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) करण्यावर विचार करण्यास प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे. मंत्र्यांच्या बैठकांमुळे त्यावर काहीही विचार होऊ शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
२० आॅगस्टपासून पावसाळी ढगांची दिवसाऐवजी रात्री गर्दी होत आहे. त्यामुळे रात्री विमानाचे उड्डाण करण्याचा विचार पुढे आला. मात्र अजून तरी रात्री विमानांचे उड्डाण करण्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.
सध्या पावसासाठी विमान फ्लेअर्ससह उड्डाण घेत आहे. परंतु अपेक्षित यश मिळालेले नाही. रात्री फवारणी करणे शास्त्रोक्त असेल तर त्याचा विचार केला जाईल. कृत्रिम पाऊस ही संकल्पना वेगळी आहे. तो एक प्रयोग आहे. परंतु निसर्ग मराठवाड्यावर कृपा करील, अशी अपेक्षा सूत्रांनी वर्तविली. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी शासनाने तयारी केली. त्याची यंत्रणा परदेशातून मागविली. परंतु ती यंत्रणा येता-येता उशीर झाला, तोवर पावसाळी ढगांची गर्दीही नाहीशी झाली. आता कृत्रिम पावसासाठी ढगांचा शोध घेण्यात सी डॉप्लर रडार गुंतले आहे; तर विमान फक्त घिरट्या घालून परतत आहे. (प्रतिनिधी)