मराठवाड्याच्या सिंचन अनुशेषावर दोन महिन्यांत निर्णय - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:27 AM2018-06-04T00:27:47+5:302018-06-04T00:27:47+5:30
पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यावर सिंचनाबाबत सातत्याने अन्याय झाला. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण येणाऱ्या दोन महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदपूर येथे दिले.
अहमदपूर (जि. लातूर) : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यावर सिंचनाबाबत सातत्याने अन्याय झाला. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण येणाऱ्या दोन महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदपूर
येथे दिले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलताना ते म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळ मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे़ या योजनेचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज आहेत़
शिवकालीन जलयोजनेच्या माध्यमातून शिवरायांची दूरदृष्टी दिसते, असे नमूद करीत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकºयांना पुरेसे पाणी उपलब्ध झाले तर कृषी क्षेत्रात परिवर्तन घडेल़ शिवरायांनी
जलसाठे विकेंद्रित करण्याचे काम केले़ त्याच धर्तीवर सरकार काम करेल़ विशेषत: मराठवाड्याच्या अनुशेषाकडे आपण लक्ष देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले़
तूर व हरभरा खरेदीसाठी शासन कटिबद्ध असून, ज्यांनी नोंदी केल्या आहेत त्यांची तूर, हरभरा खरेदी केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले़