नोटाबंदीचा निर्णय फसलाच

By admin | Published: January 9, 2017 05:13 AM2017-01-09T05:13:28+5:302017-01-09T05:13:28+5:30

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला, तो आत्मविश्वास ३१ डिसेंबर रोजी झालेल्या भाषणात दिसला नाही. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसला आहे

The decision not to be annihilated | नोटाबंदीचा निर्णय फसलाच

नोटाबंदीचा निर्णय फसलाच

Next

मुंबई : ८ नोव्हेंबर रोजी ज्या आत्मविश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला, तो आत्मविश्वास ३१ डिसेंबर रोजी झालेल्या भाषणात दिसला नाही. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसला आहे आणि हे मी म्हणत नाही, तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे. अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
जागतिक मराठी अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ (ट्रस्ट) तर्फे दादर येथील शिवाजी
मंदिर येथे दोनदिवसीय मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या संमेलनाच्या सांगता सोहळ््यात राज ठाकरे यांची रविवारी मुलाखत घेण्यात आली, या वेळी ते बोलत होते.
राज्यात असलेल्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यास सरकार असमर्थ ठरत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अरबी समुद्रात उभारण्याचा घाट म्हणजे, खिशात पैसे नसताना घेतलेला निर्णय आहे. त्यापेक्षा शिवाजी महाराजांची महती जपण्यासाठी त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवस्मारकाविषयी राज म्हणाले, अमेरिकेतील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीच्या शिल्पाला समोर ठेवून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे, परंतु समुद्रात हे शिल्प उभारण्यापूर्वी शिल्प म्हणजे काय? याची माहिती आहे का? उभारलेल्या पुतळ््यांवरून गल्लोगल्ली होणारे राजकारण कमी आहे का? त्यात आणखी नवा पुतळा समुद्रात उभारायचा कशाला? शिवाजी महाराजांबद्दल इतकाच आदर असेल, तर त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज कोण? हे लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना इतिहासाच्या माध्यमातून शिकवा, तरच तो अधिक बिंबेल आणि असे पुतळे उभारण्याची गरज भासणार नाही. पंतप्रधानांच्या योेजनेत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा समावेश आहे, ती कशाला? यामागे स्वतंत्र मुंबई करण्याचे मोदी यांचे षडयंत्र आहे. कारण मुंबई-दिल्ली अशी विमान फेऱ्यांना अधिक मागणी असताना, मुंबई-अहमदाबाद हा मार्ग कशाला? विशेष म्हणजे, या प्रवासात राज्यासाठी केवळ चारच थांबे आहेत. त्यामुळे हे षडयंत्र ओळखा, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)
व्यंगचित्राचा उलगडला प्रवास
राज यांनी या वेळी त्यांच्या व्यंगचित्राचा प्रवास उलगडला. पाश्चिमात्य कलांविषयी ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशात कलेची कदर केली जाते. ती आपल्या देशात हवी तशी केली जात नाही.
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सहलीसाठी आलेली किती मुले तेथील चित्रे पाहतात? हा प्रश्न आहे. कारण दिलेल्या वेळेत मुलांना जहांगीर आर्ट गॅलरी दाखवली जाते. तेथे मांडलेली चित्रे नाहीत. त्यामुळे कलेची बीजे मुलांमध्ये रुजणार कशी?
उदाहरणादाखल ते म्हणाले की, २६ जुलै २००५ च्या मुंबईच्या पावसात चित्रकार माधवराव सातवळेकर यांनी काढलेल्या चित्रांचा अक्षरश: चिखल झाला. त्यांच्या या अमूल्य चित्रांसाठी सरकार पुढे सरसावले नाही, ही खंत आहे. त्यामुळेच कलेची कदर भारतात इतर देशांच्या तुलनेत होत नाही.
१ - कला टिकविण्यासाठी इतिहासाचे जतन करणे आवश्यक आहे. ते केले जात नाही. त्याला कारणीभूत शिक्षणपद्धती आहे. आपल्याकडे शिक्षणपद्धतीची तर बोंबच आहे. येणारा प्रत्येक नवा शिक्षणमंत्री आपल्याप्रमाणे शिक्षणाविषयीचे धोरण ठरवतो, परंतु शिक्षणपद्धतीत सुधारणा झालेली दिसत नाही. उलट मुलांसमोर काय करावे, हा प्रश्न कायमच असतो.
२ - शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असून, अभ्यासक्रम हा एकत्रित विचार करून तयार केला पाहिजे. म्हणजे आता होणारा गोंधळ टाळता येईल. दप्तरांच्या ओझ्यावर टीका करताना ते म्हणाले की, दप्तरांचे ओझे म्हणजे काय? हे नेमके कोणाला कळले नाही. कारण काटे घेऊन केवळ दप्तरांचे वजन मोजण्यापेक्षा पुस्तके कशी कमी करता येतील, याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

Web Title: The decision not to be annihilated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.