आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:25 AM2018-03-31T05:25:50+5:302018-03-31T05:25:50+5:30
शहराजवळील नांदेणी गावातील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करणाºया आरोपीचे वकीलपत्र कुणीही घ्यायचे नाही, असा एकमुखी ठराव मुरबाड दिवाणी
मुरबाड : शहराजवळील नांदेणी गावातील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करणाºया आरोपीचे वकीलपत्र कुणीही घ्यायचे नाही, असा एकमुखी ठराव मुरबाड दिवाणी न्यायालयात काम करणाºया सर्व वकिलांनी केला आहे.
नांदेणी गावातील जयवंत भोईर या व्यक्तीने चौथीत शिकणाºया सूरज भोईर या विद्यार्थ्याची दोन दिवसांपूर्वी कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. नंतर, पोलिसांनी आरोपीला अटक करून मुरबाड दिवाणी न्यायालयात हजर केले. मात्र, मुरबाड बार असोसिएशनने एकमुखी ठराव करून लहान मुलाची हत्या केली, म्हणून या आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेणार नाही, असा निर्णय घेतला. आरोपीचा बचाव न झाल्याने न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मुरबाड बार असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यात सर्वांनी कौतुक केले असून मुरबाडव्यतिरिक्त बाहेरील वकील जरी आरोपीचे वकीलपत्र घेण्यास तयार झाला, तर त्या वकिलाला समज देऊन निर्दयी मारेकºयाचे वकीलपत्र न घेण्यासाठी सांगितले जाईल. याबाबत, मुरबाड बार असोसिएशनचे अॅड. दीपक देशमुख म्हणाले की, आरोपी जयवंत भोईर याने एका निष्पाप लहान बालकाची हत्या केली आहे.