Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 09:55 AM2022-10-21T09:55:23+5:302022-10-21T09:55:47+5:30

दिवाळी तुरुंगात की कारागृहात?

Decision on Anil Deshmukh s bail application today cbi court | Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

Next

मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निकाल गुरुवारी राखून ठेवला. अनिल देशमुख व सीबीआयचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय देऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे देशमुख यांची दिवाळी घरी की कारागृहातच साजरी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला व आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत सीबीआय व ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.  काहीच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जामीन मंजूर केला आणि सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

गुरुवारी सीबीआयतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाचे न्या. एस. एच. ग्वालानी यांनी शुक्रवारी निकाल देण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट केले. देशमुख यांना गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली होती.

Web Title: Decision on Anil Deshmukh s bail application today cbi court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.