Nitesh Rane: नितेश राणे यांच्या जामिनावर आज निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 08:24 AM2022-02-01T08:24:51+5:302022-02-01T08:25:19+5:30
Nitesh Rane: भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामिनाबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी दुपारी तीन वाजता दिला जाईल, असा निर्णय येथील सत्र न्यायालयाने दिला.
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामिनाबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी दुपारी तीन वाजता दिला जाईल, असा निर्णय येथील सत्र न्यायालयाने दिला.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. सत्र न्यायालयात दोन्ही
बाजूच्या वकिलांनी तब्बल साडेपाच तास युक्तिवाद केला. न्यायमूर्तींनी जामिनाचा निकाल मंगळवारी
दिला जाईल, असे सांगत सुनावणी तहकूब केली. या सुनावणीदरम्यान नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे आणि सरकारी वकील
प्रदीप घरत यांच्यात जोरदार
युक्तिवाद झाला.