लिंगायत समाजाला आरक्षणाचा निर्णय

By Admin | Published: August 29, 2014 03:49 AM2014-08-29T03:49:38+5:302014-08-29T03:49:38+5:30

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आला.

Decision to Resend Lingayat Community | लिंगायत समाजाला आरक्षणाचा निर्णय

लिंगायत समाजाला आरक्षणाचा निर्णय

googlenewsNext

मुंबई : केंद्र शासनाकडे लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याची शिफारस करण्यासह समाजातील ११ पोटजातींना ओबीसीत तर ३ पोटजातींचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे लिंगायत समाजातील विविध मागास पोटजातींचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया सोपल यांनी दिली.
इतर मागास प्रवर्गात समाविष्ट
लिंगायत गुरव, लिंगायत जंगम, लिंगायत कुंभार, लिंगायत न्हावी, लिंगायत परीट, लिंगायत धोबी, लिंगायत फुलारी, लिंगायत सुतार, लिंगायत वाणी, लिंगायत तांबोळी, लिंगायत कुल्लेकडगी.
विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट
लिंगायत कोष्टी, लिंगायत देवांग, लिंगायत साळी. याशिवाय, लिंगायत रेड्डी, कानोडी, लिंगडेर, लिंगधर, शिलवंत, दिक्षावंत, पंचम, लिंगायत चतुर्थ, हिंदू लिंगायत, हिंदू विरशैव, विरशैव लिंगायत, लिंगायत तिराळी या पोटजातींचा इतर मागास प्रवर्गात समावेश करण्यास राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिफारस करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

Web Title: Decision to Resend Lingayat Community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.