खासदार गोपाळ शेट्टींचा जागा परत करण्याचा निर्णय
By admin | Published: January 18, 2016 07:17 PM2016-01-18T19:17:49+5:302016-01-18T19:30:00+5:30
मुंबईतील मोकळ्या जागांबाबत सध्या राजकीय फडात चांगलाच वाद उफाळून आल्याचे दिसून येत आहे. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्याकडे असलेली पोईसर जिमखाना
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, : मुंबईतील मोकळ्या जागांबाबत सध्या राजकीय फडात चांगलाच वाद उफाळून आल्याचे दिसून येत आहे. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्याकडे असलेली पोईसर जिमखाना आणि वीर सावरकर उद्यानाची जागा पालिकेला परत करण्याचा निर्णय घेतला, असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधानंतर मुंबईतील मोकऴ्या जागांबाबतच्या पालिकेच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. तसेच, खासगी विकासकांच्या ताब्यातल्या २३६ जागा परत घेण्याचे आदेशही दिले आहेत. यामध्ये काही भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या जागांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर भाजप नेत्यांनी आपल्याकडील असलेला जागा महापालिकेला परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. यात भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी पोईसर जिमखाना आणि वीर सावरकर उद्यानाची जागा परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे नेते भूखंडवापसी कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.