टीईटी पेपरफुटीबाबत आज निर्णय

By Admin | Published: January 28, 2016 01:37 AM2016-01-28T01:37:21+5:302016-01-28T01:37:21+5:30

‘राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या संदर्भात संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे कारवाई

Decision on TET Paperfood today | टीईटी पेपरफुटीबाबत आज निर्णय

टीईटी पेपरफुटीबाबत आज निर्णय

googlenewsNext

पुणे : ‘राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या संदर्भात संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे कारवाई केली जाईल. महावीर माने यांच्याकडे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्षपद असले, तरीही तो त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार आहे. शिक्षण सचिव नंदकुमार आणि इतर शिक्षण अधिकारी यांच्यासमवेत गुरुवारी मुंबईत बैठक होईल. त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य वैद्यकीय शिक्षण
परिषदेने राज्यातील ५०० जागा का रद्द करू नयेत, असे पत्र पाठविले असले, तरीही परिषदेतर्फे दरवर्षी अशा प्रकारचे पत्र शिक्षण विभागाकडे येत असते, परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यात येत आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणातील एकही जागा कमी होणार नाही, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली, तसेच राज्यात शिक्षण विभागात ३५ ते ४० टक्के जागा रिक्त आहेत. काही पदे ही पदोन्नतीची आहेत. येत्या दीड वर्षांत ही पदे भरण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Decision on TET Paperfood today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.