युतीबाबत रविवारी होणार निर्णय

By admin | Published: July 23, 2016 01:52 AM2016-07-23T01:52:55+5:302016-07-23T13:40:28+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेनेसमोर युतीचा हात पुढे केला आहे.

The decision will be decided on Sunday | युतीबाबत रविवारी होणार निर्णय

युतीबाबत रविवारी होणार निर्णय

Next


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेनेसमोर युतीचा हात पुढे केला आहे. भाजपाशी युती करायची किंवा नाही, या विषयी रविवारच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मते जाणून घेण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी राजकीय पक्षांनी आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. गेल्या
महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा थेरगाव येथे झाला. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पिंपरीत येऊन पक्षातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. समविचारी पक्षांची युती करण्यास हरकत नाही, असा सूर आळविला आहे. त्यानंतर भाजपानेही शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली. महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. (प्रतिनिधी)
>राष्ट्रवादीमुक्त महापालिका करायची असेल, तर शिवसेनेशी युती आवश्यक आहे, असे निर्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच भाजपाने शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे.

Web Title: The decision will be decided on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.