फैसला नेते नव्हे, जनता करेल!

By admin | Published: July 12, 2014 02:11 AM2014-07-12T02:11:35+5:302014-07-12T02:11:35+5:30

‘माङया स्वच्छ प्रतिमेची कोणाला अडचण होत असली, तरी त्याबाबत फैसला करणारे नेते कोण? आता जनताच फैसला करेल,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

The decision will not be the leader, the public! | फैसला नेते नव्हे, जनता करेल!

फैसला नेते नव्हे, जनता करेल!

Next
मुंबई : पक्षश्रेष्ठींनी अभय दिल्यामुळे निर्धास्त झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून, ‘माङया स्वच्छ प्रतिमेची कोणाला अडचण होत असली, तरी त्याबाबत फैसला करणारे नेते कोण? आता जनताच फैसला करेल,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
   दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळवून शुक्रवारी मुंबईत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी पहिल्यांदाच मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या चेह:यावर प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत ‘दिल्ली’ जिंकल्यामुळे ते जोमाने विधानसभेच्या तयारीला लागल्याचे दिसून आले. आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे अनेक जण त्रस्त आहेत. या प्रतिमेपायीच निर्णय होत नाहीत असे म्हटले जाते. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, माझी प्रतिमा लोकांसमोर आहे. निवडणुकीत जनता मतदान करत असते, नेते नव्हे. त्यामुळे माङया पारदर्शक कारभाराला जनतेची पसंती मिळेल असा मला विश्वास आहे. 
   आपला कारभार गतिमान नाही, अशा विरोधकांच्या आरोपाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, आरटीआय कायद्यामुळे अनेक प्रकरणो बाहेर आली. त्यामुळे अधिकारी सावधगिरीने निर्णय घेतात. त्याचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर होतो, अशी कारणमीमांसाही त्यांनी केली.
अमित शाह भाजपाचे अध्यक्ष झाल्याचा फायदा भाजपाला राज्यात होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला 144 जागांची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, असे विषय पत्र परिषदेत बोलण्याचे नसतात. समन्वय समितीच्या बैठकीत आम्ही चर्चा करू. आघाडीत कोण किती जागा लढेल ते ठरविले जाईल.
 
च्आपण विधानसभेची निवडणूक लढणार का, यावर मुख्यमंत्री म्हणाले, वेळ येईल तेव्हा मी याबाबत सांगेन. वेळ केव्हा येईल या पत्रकारांच्या चिमटय़ाला मुख्यमंत्र्यांनी, ‘मी सांगेन तेव्हा वेळ येईल,’ असे उत्तर देताच हशा पिकला.

 

Web Title: The decision will not be the leader, the public!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.