राज्यात ‘डीएड’ला उतरती कळा

By Admin | Published: July 22, 2016 08:13 PM2016-07-22T20:13:52+5:302016-07-22T20:19:35+5:30

डी.एड. झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शास्वती नाही. राज्यात सद्या डी.एड. झालेल्या तरुणांची मोठी फौज बेरोजगारीच्या विळख्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर

Declaration of DD in the State | राज्यात ‘डीएड’ला उतरती कळा

राज्यात ‘डीएड’ला उतरती कळा

googlenewsNext

- विजय सरवदे

औरंगाबाद, दि.22 -  डी.एड. झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शास्वती नाही. राज्यात सद्या डी.एड. झालेल्या तरुणांची मोठी फौज बेरोजगारीच्या विळख्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पाठ डी.एड. कॉलेजकडे फिरवली असून शेकडो कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे, यंदा ९ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती; पण लगेच काही संस्था चालकांनी या प्रवेश प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले. परिणामी, दोन महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया स्थगित आहे.
सन २०१० पर्यंत डी.एड. कॉलेजेससाठी सुगीचे दिवस होते. डी.एड.ला प्रवेश घेण्यासाठी वारेमाप डोनेशन दिले जायचे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंब्बड उडायची. २०१० नंतर मात्र हे चित्र पालटले. २०१० मध्ये केंद्रीय शिक्षक भरती झाली. त्यानंतर आजपर्यंत पुन्हा कधी शिक्षकांची भरती राबविण्यात आलीच नाही. कधी काळी नोकरीची हमखास हमी असणारे डी.एड. कॉलेजेस आता मात्र बेरोजगारांची फौज तयार करणारे कारखाने झाले आहेत. पूर्वीची डी.एड. व आताची डी.टी.एड. पदविका घेणारे लाखो तरुण सध्या बेरोजगार आहेत. गेल्या वर्षी तर मराठवाड्यातील प्रवेशाच्या ३ हजार जागांपैकी तब्बल दोन हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. अवघे ३० टक्के  झाले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी डी.एड. कॉलेजेसकडे पाठ फिरवल्यामुळे राज्यभरातील अनेक अध्यापक पदविका महाविद्यालये दिवसेंदिवसविद्यार्थ्यांनी ओस पडत चालली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८९ डी.एड. कॉलेजेसपैकी ५० टक्के कॉलेजेस अर्थात ४२ कॉलेजेस सध्या तग धरुन आहेत. 
राज्यात ११०० डी.एड. कॉलेजेस होती. त्यापैकी १९ शासकीय अध्यापक पदविका महाविद्यालय, तर १०० ते १२५ अनुदानित महाविद्यालये आहेत. उर्वरित ७०० ते ८०० विना अनुदानित डी.एड. महाविद्यलयांपैकी ५० टक्केच्या वर महाविद्यालये चालविणे शक्य नसल्यामुळे संस्थाचालकांनी आपली महाविद्यालयेच बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. भोपाळ येथील ‘एनसीईटी’ याच संस्थेला डी.एड. महाविद्यालय सुरू करण्याचे आणि बंद करण्याचेही अधिकार आहेत. ‘एनसीईटी’कडून महाविद्यालय बंद करण्यास परवानगी मिळालेली नसल्यामुळे संस्थाचालक आणि तेथे काम करत असलेले एम.एड.धारक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
 
आयडीयल बॅचलाही मिळेना विद्यार्थी

 

जिल्हास्तरीय ‘डायट’ अर्थात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत ५० विद्यार्थ्यांची एक ‘डीएड आयडीयल’ बॅच असते. अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळतो. तज्ज्ञ शिक्षकांकडून या बॅच मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते; पण गेल्या तीन वर्षांपासून ‘डायट’ मधील ‘आयडीयल’ बॅचसाठीदेखिल विद्यार्थी मिळेनात. त्यामुळे ‘डायट’च्या मनुष्यबळाचा वापर आता जि.प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वापरले जाणार आहे. राज्यातील जवळपास ३५ ‘डायट’ची सारखीच अवस्था आहे.

Web Title: Declaration of DD in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.