महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर
By Admin | Published: November 30, 2015 11:52 PM2015-11-30T23:52:37+5:302015-11-30T23:55:18+5:30
निवड चाचणी : शालेय १४, १७, १९ वर्षे वयोगटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली निवड
वाळवा : येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेतून निरीक्षक अनिल चोरमुले यांनी सोमवारी १४, १७, १९ वर्षे (मुले व मुली) गटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ यांनी जाहीर केले. संघ असे : १४ वर्षे मुले : यश मिरजे, धीरज चव्हाण- (कोल्हापूर), वैभव गवळी, राहुल जाधव, सूरज काळे (उस्मानाबाद), कुणाल घोडशील, आशय ढोले, रोहन वळवी (पुणे), गिरीराज काळे, अमन डंबे (मुंबई), विजय शिंदे (बीड), प्रतीक निकम (यवतमाळ), चंदू चावरे (नाशिक), अस्लम मुलाणी (सांगली).
१४ वर्षे मुली : रितिका मगदूम, काजल पवार, अश्विनी पारसे (सांगली), प्राजक्ता चितळकर, हर्षदा करे (पुणे), दीक्षा सोनसुरकर, आकांक्षा वर्जे, साक्षी बापेकर, साक्षी तोरणे (मुंबई), तेजस्विनी बोरसे (जळगाव), स्रेहल नाते (सातारा), फुलावड, आयेशा मुलाणी, साक्षी वाघ, सानिया फाटक (नाशिक).१७ वर्षे मुले : प्रथमेश शेळके, शुभम माने, अभिषेक केरीपाळे, गुरुप्रसाद कित्तुरे (कोल्हापूर), संकेत कदम, निखिल वाघ, अमेय झगडे (मुंबई), संदेश जाधव, अभिषेक पवार (पुणे), तिरुपती गोडसे (लातूर), सुमेश ढोकणे (औरंगाबाद), प्रशिक सुपारे (नाशिक), निहार दुबळे (मुंबई), भावेश खोकले (अमरावती), राजीव फुलमाळी (पुणे), संजय अहिवळे (कोल्हापूर).
१७ वर्षे मुली : प्राजक्ता पवार, धनश्री भोसले, अपेक्षा सुतार (कोल्हापूर), रूपाली घोगरे, प्रियांका इंगळे (पुणे), रेशम राठोड, गुलाब मस्कर, आरती कदम (मुंबई), पायल जाधव (अमरावती), मयुरी मुत्यार (पुणे), शीतल प्रभाळे (औरंगाबाद), कविता कुंभार (कोल्हापर), हेमलता गायकवाड (नाशिक), स्रेहल पाटील (पुणे), मयुरी बारस्कर (मुंबई).
१९ वर्षे मुले : दशरथ जाधव, अक्षय सुतार, विक्रम पाटील, सत्यजित सावंत, अरुण घुणकी, तेजस मगर (कोल्हापर), सागर लेंगरे (पुणे), जयंत शिनगर, निरंजन ढाके (नाशिक), आकाश तोरणे, आदित्य कांबळे (मुंबई), लोकेश रंगारी (अमरावती), प्रतीक डेबरे (मुंबई), नीलेश मोरे (मुंबई), अक्षय शिंदे, अनिकेत जाधव (कोल्हापूर). १९ वर्षे मुली ऐश्वर्या सावंत, श्रध्दा लाड, अमृता कोकीतकर (कोल्हापूर), प्रणाली बेंदके, रोहिणी गोरे, निकिता मरकड, प्रियांका भोपी, कविता घाणेकर (पुणे), श्रुती सपकाळ, दीक्षा कदम (मुंबई) वैष्णवी भड, (लातूर), रूपाली बडे (मुंबई), अमृता भोर, काजोल भोर, निकिता भुजबळ (पुणे), तेजश्री कोंडाळकर (मुंबई).
यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक उपस्थित होते. (वार्ताहर)
निवड समितीत सांगलीच्या भांदिगरेंचा समावेश
१४ वर्षे गटासाठी निवड समितीत सलन जाधव (उस्मानाबाद), गुरूदत्त चव्हाण (जळगाव), भीमराव भांदिगरे (सांगली) यांचा, १७ वर्षे गटासाठी संजय मुंढे (औरंगाबाद), श्रीमती मनीषा मानकर (चंद्रपूर), अभिजित पाटील (उस्मानबाद), श्रीमती मनीषा मानकर (चंद्रपूर), अभिजित पाटील (उस्मानाबाद) यांचा, १९ वर्षे गटासाठी निवड समितीत अजय पवार (बीड), अजय शिपूर (जळगाव) यांचा समावेश होता. त्यांना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे प्रशांत पवार, राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव नरेंद्र कुंदर यांनी सहकार्य केले.