वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर ; महाराष्ट्रात सार्थक भट पहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:05 PM2019-06-05T15:05:31+5:302019-06-05T15:09:39+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून देशात राजस्थानच्या नलीन खंडेलवाल ९९.९९ पर्सेन्टाइल आणि ७०१ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Declared the results of NEET exam; Nilin Khandelwal of Rajasthan is the first in the country
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून देशात राजस्थानच्या नलीन खंडेलवाल ९९.९९ पर्सेन्टाइल आणि ७०१ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रात सार्थक भट याने प्रथम आणि देशात सहावा क्रमांक मिळवल आहे. सार्थकला ६९५ गुण मिळाले आहेत. राज्यात साईराज माने याने दुसरा तर सिद्धार्थ दाते याने तिसरा पटकावला. मुलींमध्ये देशात तेलंगणा येथील माधुरी रेड्डी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर दिशा अगरवाल हिने महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेस महाराष्ट्रातून २ लाख १६ हजार १७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ६ हजार ७४५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यात ८१ हजार १७१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशभरातून नीट परीक्षेसाठी १४ लाख १० हजार ७५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७ लाख ९७ हजार ४२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. २०१८मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५६. २७ एवढी होती. यंदा हा टक्का ५६.५० पर्यंत वाढला आहे.