कारवाईनंतरही घर सोडण्यास नकार

By admin | Published: June 25, 2014 01:53 AM2014-06-25T01:53:58+5:302014-06-25T01:53:58+5:30

वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील अनधिकृत घरांचे वीज, पाणी आणि गॅस तोडल्यानंतरही रहिवासी घरे सोडण्यास तयार नाहीत.

Decline to leave home after action | कारवाईनंतरही घर सोडण्यास नकार

कारवाईनंतरही घर सोडण्यास नकार

Next
>मुंबई : वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील अनधिकृत घरांचे वीज, पाणी आणि गॅस तोडल्यानंतरही रहिवासी घरे सोडण्यास तयार नाहीत. वीज, पाणी नसलेल्या घरांतच मुक्काम ठोकणारे रहिवासी ‘घर सोडून जायचे  कुठे,’ असा सवाल विचारत आहेत.
पटेल अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर राहणारे शहा कुटुंब आजही घराचा ताबा सोडण्याच्या तयारीत नव्हते. काल वीज कापल्यानंतर आज पाणीपुरवठाही खंडित केल्याचे शहा कुटुंबातील युवक अंकित याने सांगितले. तो म्हणाला, ‘घरातील महत्त्वाचे सामान याआधीच नातेवाइकांकडे हलवले आहे. तरीही घराचा ताबा सोडणार नाही. तात्पुरते जेवणाची आणि इतर प्रात:विधीची सोयही नातेवाइकांकडे केली आहे.’   घरात सामान नसले, तरी मिडटाऊन अपार्टमेंटच्या 19व्या मजल्यावरील श्रीनिवास कुटुंबाने रात्रीचे जेवण घरीच करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीनिवास यांचा नोकर मेहेशचंद्र आर्या वीज, पाण्याविनाच रात्रीचे जेवण तयार करण्यात व्यस्त होता. मूळचा उत्तराखंडचा असलेला आर्या गेल्या 1क् वर्षापासून श्रीनिवास यांच्याकडे काम करीत असल्याचे सांगत होता. तो म्हणाला, ‘घरी 14 वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. महाप्रलयामुळे गावाकडे जाऊ शकत नाही. आज घर तुटणार असल्याचे कळत असले तरी मालकांनी काम सोडून जाण्यास सांगितले नाही. आज रात्रीचे जेवण तयार करण्यास सांगितल्याने त्याचीच तयारी करीत आहे. उद्या काय करायचे, हे अजूनही माहीत नाही.’  (प्रतिनिधी)
 
च्मंगळवारी दिवसभर पालिका, बेस्ट आणि महानगर गॅसचे कर्मचारी आपली कारवाई करत होते. कम्पाउंडमध्येही नीरव शांतता होती. इमारतीबाहेरून पाचव्या मजल्यावरील पाइपलाइन कापत कर्मचारी अनधिकृत घरांमधील गॅसपुरवठा खंडित करत होते. अनधिकृत घरांचा गॅसपुरवठा तत्काळ खंडित केला असला, तरी घरांतील मीटर मात्र घरांच्या चाव्या मिळाल्यानंतरच काढणार असल्याचे एका अधिका:याने सांगितले. दिवसभर 9क् घरांचा वीज, 47 घरांचा गॅस आणि 25 घरांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. 

Web Title: Decline to leave home after action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.