एड्सचे प्रमाण घटले
By Admin | Published: December 1, 2015 02:00 AM2015-12-01T02:00:10+5:302015-12-01T02:00:10+5:30
एचआयव्ही एड्सला टाळू शकतो. लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घ्या, कंडोमचा वापर करा, अशी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ग्रामीणभागापेक्षा शहरी भागात
- पूजा दामले, मुंबई
एचआयव्ही एड्सला टाळू शकतो. लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घ्या, कंडोमचा वापर करा, अशी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ग्रामीणभागापेक्षा शहरी भागात सुशिक्षितांची संख्या अधिक असूनही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे एचआयव्हीची बाधा झालेल्यांचे प्रमाण ९३ टक्के आहे.
गेल्या वर्षभरात आढळलेल्या एचआयव्हीबाधित रुग्णांच्या कारणांचा अभ्यास केल्यावर ही माहिती उघड झाली आहे. एचआयव्ही हा आजार ४ कारणांमुळे संक्रमित होतो. त्यापैकी ३ कारणांमध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे. पण, स्वत:मुळे अनेकजण एचआयव्हीचीग्रस्त होत असल्याचे दिसून आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आईकडून बाळाला होणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण ३.८ टक्के इतके आहे. तर, पुन्हा वापरण्यात आलेल्या सुयांमुळे एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण ०.३ टक्के तर विषाणूबाधित रक्ताच्या संक्रमणामुळे एचआयव्ही होण्याचे प्रमाण हे ०.५ टक्के इतकेच आहे.
या सर्व कारणांना सरकारने आखलेल्या उपयायोजना आणि जनजागृती कार्यक्रमामुळे आळा बसला आहे, असे मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.
तरुण पिढीत एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. याला आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर
लक्ष केंद्रित करुन जनजागृती कार्यक्रम करणे आवश्यक
आहे. मुंबईत अशाप्रकारचे
कार्यक्रम रेड रिबीन क्लबच्या माध्यमातून केले जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतील जनजागृतीसाठीे नवीन योजना
- आरटीओ, मुंबई पोर्टट्रस्ट, बेस्ट यांच्याबरोबर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था काम करत आहे. एचआयव्हीचे लवकर निदान व्हावे म्हणून ट्रक चालक, चालक यांची तपासणी केली जाते.
- खासगी नर्सिंग होम आणि प्रसूतीगृहांबरोबर काम केले जाते. येथून एचआयव्हीबाधित गर्भवती महिलांची माहिती घेतली जाते.
- एम्लॉयर लीड मॉडेलमार्फत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कामगारांची तपासणी केली जाते. कामगारांमध्ये जनजागृती केली जाते.