दारू विक्रीत निम्म्याने घट

By admin | Published: June 7, 2017 04:48 AM2017-06-07T04:48:41+5:302017-06-07T04:48:41+5:30

महामार्गांपासून अर्धा किमी अंतरावरील परमीट रूम रद्द झाल्याने दारू विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली

Decrease in alcohol sales | दारू विक्रीत निम्म्याने घट

दारू विक्रीत निम्म्याने घट

Next

विलास बारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महामार्गांपासून अर्धा किमी अंतरावरील परमीट रूम रद्द झाल्याने दारू विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गत एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तब्बल ४२९ कोटींचा महसूल कमी झाला आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात देशी-विदेशी व बीअरच्या विक्रीत तब्बल ६० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग या ठिकाणी होत असलेल्या दारूविक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष काढत सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांपासून ५०० मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री करण्यास बंदी घालत १ एप्रिलपर्यंत ही दुकाने हटवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार परमिट रूम, वाइन शॉप व बीअर शॉपी दुकाने बंद झाली. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल घटला आहे. गेल्या वर्षी एप्रिल व मे २०१६ दरम्यान ९८१ कोटी ६३ लाख ८ हजारांचा महसूल मिळाला होता. मात्र यंदा या दोन महिन्यांत केवळ ५५२ कोटी ४५ लाख ३५ हजारांचा महसूल या विभागाला मिळाला आहे.
>ठाणे, नाशिक व पुणे विभागाला सर्वाधिक फटका
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यात ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर असे सहा विभाग आहेत. या निर्णयाचा ठाणे, नाशिक व पुणे विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे. औरंगाबाद विभागातील अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या प्रकल्पांमुळे महसूल वसुली काही प्रमाणात आवाक्यात आहे.
विभाग२०१७२०१६
ठाणे११५१.४११२७०८.१९
नाशिक७२८४.६५१३३५९.१०
पुणे३२२१.३१२१४६९.९३
कोल्हापूर५४०५.८९७९२७.२९
औरंगाबाद३३१०५.४१३७८८२.१०
नागपूर५०७६.६८४८१६.४७
एकूण५५२४५.३५९८१६३.०८
(टीप-रक्कम लाखात)

Web Title: Decrease in alcohol sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.