वातावरणातील बदल अन् करपा रोगमुळे कांदा उत्पादनात घट; भाव नसल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 12:38 PM2023-12-18T12:38:18+5:302023-12-18T12:38:32+5:30

शेतकऱ्याचे जीवनच संकटाच असल्याची खंत कांदा उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखविले. 

Decrease in onion production due to climate change and Karpa disease | वातावरणातील बदल अन् करपा रोगमुळे कांदा उत्पादनात घट; भाव नसल्याने शेतकरी चिंतेत

वातावरणातील बदल अन् करपा रोगमुळे कांदा उत्पादनात घट; भाव नसल्याने शेतकरी चिंतेत

चोपडा तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण यामुळे कांदा पिकावर करपा रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. 

या वातावरण बदलामुळे कांद्याची गोलाईत लहान मोठा आकार झाला आहे. त्याचबरोबर कांद्याला भाव नसल्याने जो लागलेला खर्च आहे तो देखील निघेल की नाही, अशी चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहे. जर अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण तालुक्यात आले नसते तर कांदा उत्पादनात वाढ झाली असती आणि शेतकऱ्याच्या लागलेला खर्च तो देखील निघाला असता, शेतकऱ्याचे जीवनच संकटाच असल्याची खंत कांदा उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखविले. 
 

Web Title: Decrease in onion production due to climate change and Karpa disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.