आळेफाटा बाजारात कांदा दरात घट

By admin | Published: May 9, 2014 06:10 PM2014-05-09T18:10:50+5:302014-05-09T22:25:55+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात आज कांद्याच्या आवकेमध्ये वाढ झाली. मात्र, कांद्यांच्या बाजारभावात घसरण झाली आहे.

Decrease in Onion Prices in the Elephata Market | आळेफाटा बाजारात कांदा दरात घट

आळेफाटा बाजारात कांदा दरात घट

Next

आळेफाटा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात आज कांद्याच्या आवकेमध्ये वाढ झाली. मात्र, कांद्यांच्या बाजारभावात घसरण झाली आहे.
कांद्याच्या चांगल्या आवकेसाठी उत्तर पुणे जिल्‘ात आळेफाटा उपबाजार प्रसिद्ध आहे. बाजारभावाच्या असणार्‍या तेजी-मंदीतही येथे चांगली आवक होत असते. जुन्नर तालुक्याबरोबरच शेजारील संगमनेर, अकोले, पारनेर येथीलही कांदा येथे विक्रीस येत असल्यामुळे या उपबाजारात आवकही चांगल्या प्रमाणावर होत आहे. हिवाळी हंगामात लागवड झालेल्या कांद्याची काढणी झाली असल्याने शेतकरीवर्गही कांदा येथे विक्रीस आणत आहे.
उपबाजारात मागील आठवड्यामध्ये २० हजारांच्या वर कांदागोणी विक्रीस आल्या होत्या. प्रतवारीप्रमाणे १०० ते १४० रुपये प्रतिकिलो, असा बाजारभावही येथे मिळाला. आजच्या आठवडेबाजारात येथे जवळपास २७ हजार कांदागोणी विक्रीस आल्या. तर, बाजारभावात घट होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति १० किलो १३० रुपये बाजारभाव मिळाला. या वर्षीच्या विविध अशा प्रकारच्या हवामानाचा परिणाम कांद्याच्या गुणवत्तेवर झाला आहे. त्यामुळेही बाजारभाव अद्यापही योग्य प्रमाणात वाढत नाही.

Web Title: Decrease in Onion Prices in the Elephata Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.