तूर, चना डाळीच्या किमतीत घट

By Admin | Published: May 2, 2016 12:14 AM2016-05-02T00:14:51+5:302016-05-02T00:14:51+5:30

तूर डाळीच्या टंचाईनंतर वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या छापासत्रामुळे तूर आणि चना डाळींच्या किमतीत आठ दिवसात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट झाली

Decrease in prices of tur, chana and pulses | तूर, चना डाळीच्या किमतीत घट

तूर, चना डाळीच्या किमतीत घट

googlenewsNext

नागपूर : तूर डाळीच्या टंचाईनंतर वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या छापासत्रामुळे तूर आणि चना डाळींच्या किमतीत आठ दिवसात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट झाली
आहे. घाऊक बाजारात तूर डाळ १२०
ते १३५ आणि चना डाळ ६८ ते
७० रुपये किलोपर्यंत खाली
आली आहे.
छापासत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये साठा करण्याची मानसिकता नाही. गेल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात एका व्यापाऱ्याकडून धान्य वितरण विभागाने ४६१ क्विंटल तूर डाळ जप्त केली होती.
गेल्या दोन वर्षांत तुरीचे उत्पादन फारच कमी झाहे. डाळमील चालकांना ८५०० ते ९००० रुपये क्ंिवटल या दराने तूर खरेदी करावी लागत आहे. सर्व प्रक्रियेनंतर डाळ तयार झाल्यास बाजारात खरेदीसाठी ग्राहक नाहीत. शिवाय डाळ महाग असल्यामुळे कुणीही व्यापारी साठवणूक करीत नाहीत. दुसरीकडे गरीब आणि सामान्य ग्राहकांनी तूर डाळीला पर्याय म्हणून वाटाणा डाळीचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी तूर डाळ खरेदीवर अघोषित बंदी टाकल्याचे बाजारात दिसत आहे. शासनाने तपासणी व चौकशी करावी, पण साठवणुकीची मर्यादा घालून द्यावी, असे मत धान्य बाजाराचे अभ्यासक रमेश उमाठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तूर डाळीच्या किमतीत लाखोळी डाळ स्वस्त आहे. शिवाय प्रथिने जास्त प्रमाणात असल्यामुळे तिची विक्री वाढली आहे.
तांदळाच्या किमतीत चढउतार
उपलब्धतेनंतरही बाजारात मागणीअभावी तांदळाच्या किमतीत घट झाली आहे. लग्नसराईची खरेदी संपली आहे. ठोक बाजारात श्रीराम तांदळाच्या किमतीत क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची घट होऊन किंमत ४६०० ते ४६५० रुपयांवर स्थिरावली आहे. चिन्नोर तांदळात २०० रुपयांची वाढ झाली. भाव ४७०० ते ५००० रुपयांवर गेले. याउलट एचएमटी ३२०० ते ३४००, बीपीटी २८५० ते ३१००, सुवर्णा तांदूळ २२०० ते २४०० रुपयांवर स्थिर आहे. (प्रतिनिधी)

गहू वधारला : मध्यतंरी पावसामुळे काही प्रमाणात गहू खराब झाला. त्यामुळे उत्तम दर्जाच्या गव्हाला मागणी वाढली. परिणामी ठोक बाजारात क्विंटलमागे दरात ५० ते १०० रुपयांची वाढ झाली. एमपी बोट सरबती २४०० ते ३५५० रुपये, लोकवन मध्यम १९०० ते २२५० रुपये, लोकवन उत्तम २२५० ते २४००, तुकडी २२०० ते २४५० रुपये भाव आहेत. ट्रकच्या वाढीव भाड्याचा गव्हाची किंमत वाढण्यास हातभार लागल्याची माहिती उमाठे यांनी दिली.

Web Title: Decrease in prices of tur, chana and pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.